Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आवताडे शुगरच्या गळीत हंगामाची सांगता

तरुण भारतbyतरुण भारत
February 16, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा.लि कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात 4 लाख 8 हजार 900 मे.टन ऊस गाळप करून हंगामाची सांगता केली असल्याचे जाहीर केले आहे. उद्योगपती तथा कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके व सरव्यवस्थापक सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगाम सांगता समारंभ उत्साहात पार पडला.

तसेच यावेळी साखर कारखान्यातील उत्पादित 4 लाख 25 हजार 555 साखर पोत्यांचे पूजन अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हाध्यक्षा ह.भ.प.श्रीमती पार्वतीताई आवताडे यांच्या शुभहस्ते व सुनीता पवार, अंजलीताई आवताडे, सुकेशिनी आवताडे, जि.प.सदस्या करुणा शिवशरण, नगरसेविका सावित्री कोंडूभैरी, प्रतीक्षा मेटकरी, विजया गुंगे, तरन्नुम दारुवाले, यशोदा पतसंस्थाच्या चेअरमन निला आटकळे, जिजामाता पतसंस्थाच्या चेअरमन आशा नागणे, सौ.खवतोडे, रोहिणी यादव, अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सदस्या, मोहनीबुवा भजनी मंडळच्या सर्व सदस्या, आसावरी भजनी मंडळाच्या प्रमुख शुभदा जोशी व सदस्या, श्रीराम भजनी मंडळाच्या संगीता आवताडे व सदस्या  इतर सहकारी महिला सदस्या यांचे उपस्थित संपन्न झाला.

ऊस टंचाई असूनही कारखाना प्रशासनाने दिवसरात्र काम करत उच्चांकी गाळप करत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे व मार्गदर्शक आ समाधान आवताडे यांनी कारखान्यास सहकार्य केलेल्या सर्व यंत्रणांचे आभार मानले. यावेळी कारखाना कर्मचाऱ्यांना 7 दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देण्यात येत असल्याची घोषणा केली.

यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले की, चालू हंगामात कारखान्याने एकूण 4,08,890 मे.टन ऊस गळीत करून सरासरी 10.50 टक्के साखर उतारा साध्य केला असून 4,25,555 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. ही कामगिरी शेतकरी, कामगार, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकजुटीचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या कारखान्याची शासनाने निश्चित केलेली FRP 2500 रुपये प्रति मे.टन असताना कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून 3000 रुपये प्रति मे.टन एकरकमी दर देण्याचा निर्णय घेतला. 

चालू वर्षाचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व खातेप्रमुख, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतुक ठेकेदार,ऊसतोड कामगार यांचे त्यांनी अभिनंदन करून सर्वांचे आभार मानले.

सदर गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी विक्रमी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचा व उच्चाकी ऊस पुरवठादार शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला. तसेच नूतन जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे, मि. हणमंत दुधाळ, प्रदीप खांडेकर, मि. जनार्धन शिवशरण, नूतन पंचायत समिती सदस्य विनायक यादव, अर्जुन म्हल्लाळे, मि. श्रीकांत गणपाटील, मि.बाळासाहेब ताड व नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन नगरसेवक सोमनाथ हुशारे, मि.अरुण गुंगे, बाबा कोंडूभैरी यांचाही कारखान्यातर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी दामाजी शुगरचे माजी संचालक मि.भारत निकम ,संजय पवार, विजय माने, लेबर  फेडरेशनचे संचालक शाम पवार, बिरा कोळेकर, अशोक आसबे, राजू यादव, भीमराव आसबे, बटू आप्पा पवार, ऋतुराज बिले, अशोक भिंगे, शिवाजी मोहिते, शिवाजी पटाप, चंद्रकांत गोडसे, गोविंद भोरकडे, अंबाना ढाणे, बिराप्पा ढाणे, धनंजय पवार, जावेद इनामदार, दत्तात्रय गंगमई आदी मान्यवर, कारखान्याचे वर्क्स मॅनेजर, चिफ केमिस्ट, चिफ अकौंटट, डिस्टिलरी मॅनेजर, शेती अधिकारी, उपशेती अधिकारी, ऊस पूरवठा अधिकारी, एच आर मॅनेजर, विभागप्रमुख,  कर्मचारी, ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साखर पोती पूजन करताना ह.भ.प.श्रीमती पार्वतीताई आवताडे, सुनीता पवार, अंजलीताई आवताडे, सुकेशिनी आवताडे, जि.प.सदस्या करुणा शिवशरण, नगरसेविका सावित्री कोंडूभैरी, प्रतीक्षा मेटकरी, विजया गुंगे, तरन्नुम दारुवाले, यशोदा चेअरमन निला आटकळे, जिजामाता चेअरमन आशा नागणे, शुभदा जोशी, संगीता आवताडे व सदस्या

Post Views: 8
Previous Post

वाढेगावच्या त्रिवेणी संगमावर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

Next Post

ॲड.यशराजे साळुंखे पाटील पराभवानंतरही जनतेच्या दारी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ॲड.यशराजे साळुंखे पाटील पराभवानंतरही जनतेच्या दारी

ताज्या बातम्या

सख्ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून.#murdernews #ब्रेकिंगन्यूज़ #viral #news #टेंभुर्णी

February 16, 2026

ग्रंथालय कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्यां बाबत निर्णय घेण्यात यावा – सदाशिव बेडगे

February 16, 2026

लव जिहादच्या विरोधात महिलांनी एकत्रित येत दिली शासन निर्णयाची फोटो फ्रेम

February 16, 2026

युवक मंडळ यांच्यावतीने कक्कय्या जयंती साजरी

February 16, 2026

भैरूरतन दमाणी अंधशाळेकडून कु. गंगा कदम हिचा गौरव

February 16, 2026

जखमी अवस्थेत आढळला कुदळ्या पक्षी

February 16, 2026

स्व.प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रा.डॉ. बी.एच. कुलकर्णी यांना जाहीर

February 16, 2026

राज्यस्तरीय आय एम ए रनेथॉन लातूर स्पर्धेत साईश्वर, श्रद्धा व वैशाली गुंटूक प्रथम

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682768

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697