माढा : शहर व परिसरातील गावातील महापुरुषांच्या मिरवणुका डीजे मुक्त करणार असल्याचे माढा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे यांनी सांगितले. माढा पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांची सातारा येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे हे माढा पोलीस स्टेशन येथे शुक्रवारी हजर झाले आहेत. माढा येथे पदभार स्वीकारण्यापूर्वी ते करमाळा येथे कर्तव्यास होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर माढा पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील व जयंती मिरवणुकीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळेस त्यांनी असे सांगितले की न्यायालयाच्या निर्णयानुसार डीजे वापरण्यावर पूर्णतः बंदी आहे. डीजेच्या कर्कश आवाजाचा हॉस्पिटलमधल्या आजारी माणसांना वयोवृद्ध लोकांना त्यांच बरोबर नवजात बालकांना त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागतो. अनेक ठिकाणी डीजेच्या आवाजामुळे अनेकांना श्रवणदोष झाले आहे.डीजेचा आवाज नागरिकांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे माढा पोलीस स्टेशनने डीजे मुक्त मिरवणुका करण्याचा घेतलेल्या निर्णयाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन एपीआय शिंदे यांनी केले आहे.यापुढे कोणत्याही मिरवणुकीमध्ये डीजेच्या कर्कश आवाजावर बंदी असणार आहे.न्यायालयाने आवाजाच्या डीसीबल वर न्यायालयाने घातलेल्या बंदीचे काटेखोरपणे पालन करणार आहोत. महापुरुषांच्या विचारांचा वारसा आपण जपत आहोत त्यांच्या विचारांना शोभेशी जयंती साजरी होण्यासाठी डिजे मुक्त मिरवणूक करून यामध्ये पारंपारिक वाद्याचे समावेश करू मिरवणुका उत्साहात साजऱ्या करू असेही त्यांनी सांगितले.
यावेळेस उपनिरीक्षक मोहम्मद शेख, गोपनीयचे आर आर माने, पो हवालदार एन पी बोराडे, पो देविदास शिंदे अनेक गावचे पोलीस पाटील व जयंती मिरवणुकीचे पदाधिकारी उपस्थित होते.





















