Tuesday, February 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘एफस्टीन फाईल्स’ विरोधात वडार समाज संघटनेचे निषेध आंदोलन

तरुण भारतbyतरुण भारत
February 17, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी : जगात खळबळ माजवणाऱ्या ‘एफस्टीन फाईल्स’ प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना यांच्या वतीने सोमवारी (दि. १६) सकाळी ११ वाजता टेंभुर्णी- कुर्डूवाडी रस्त्यावरील कुर्डूवाडी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राजकुमार बाबा धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजकुमार बाबा धोत्रे म्हणाले की, जेफ्री एफस्टीन प्रकरणातील न्यायालयीन कागदपत्रांमध्ये (एफस्टीन फाईल्स) काही भारतीय व्यक्तींची नावे आल्याची चर्चा विविध माध्यमांतून होत आहे. त्यामुळे संबंधित नावांची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा सोलापूर जिल्ह्यात व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते महावीर वजाळे यांनी सांगितले की, अमेरिकेतील महिला पत्रकार ज्युली ब्राउन यांनी २०१८ साली या प्रकरणाला नव्याने प्रकाशझोतात आणले. त्यानंतर जेफ्री एफस्टीन याला अटक करण्यात आली आणि हे प्रकरण संपूर्ण जगापुढे उघडे झाले. ‘एफस्टीन फाईल्स’मध्ये जगातील नामवंत राजकीय नेते व उद्योगपतींची नावे असल्याची चर्चा आहे. तसेच भारतातील राजकीय व उद्योजक क्षेत्रातील काही लोकांची नावे देखील चर्चेत असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती अनिल अंबानी, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची नावे चर्चेत असल्याचा उल्लेख करून सरकारने याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी व दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

बीएमपी अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनीही ‘एफस्टीन फाईल्स’मधील सर्व नावांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

या आंदोलनात समाधान धोत्रे, तानाजी धोत्रे, रानबा मासुळे, सचिन सीना ननवरे, शंभू पवार, रोहित धोत्रे, विकास बंदपट्टे, सुनील पवार, विलाज जगताप, राहुल धोत्रे, सुरज धोत्रे, अक्षय जगताप, सचिन तांदळे, अक्षय काळे, रोहिदास पवार, नितीन धोत्रे, बालाजी मोहिते, अभिषेक धोत्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, ‘एफस्टीन फाईल्स’ प्रकरणाबाबत विविध देशांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, भारतात या प्रकरणाबाबत नेमकी भूमिका काय राहणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 16
Previous Post

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी केलेले कार्य कौतुकास्पद – महेश इंगळे 

Next Post

संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी 

ताज्या बातम्या

२३ वर्षीय तरुणाने प्रेम संबंधातून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून केली आत्महत्या.#public

February 17, 2026

महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठलाची पूजा संपन्न

February 17, 2026

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ट्रेनिंग प्रोग्रॅम 

February 17, 2026

द .ह. कवठेकर प्रशालेत मुलींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडर व डिसपोझल मशीनचे वितरण

February 17, 2026

एनईपी २०२०’ अनुषंगाने बी. कॉम. अभ्यासक्रमात नवे पर्व : प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

February 17, 2026

पंचाक्षरी लोणार नगराध्यक्ष श्री चां उपविजेता 

February 17, 2026

कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक अनिल बाबर  यांना पीएचडी पदवी प्रदान

February 17, 2026

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

February 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0683983

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697