टेंभुर्णी – माढा तालुक्यातील वडोली येथे सालाबाद प्रमाणे समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पत्रकार सतीश काळे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण व पुष्पवृष्टी करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गावातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस हार व श्रीफळ अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी ह भ प वैशालीताई पाटील यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते.
संत गाडगेबाबा यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण करून अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा संपुष्टात आणण्यासाठी काम केले. हीच खूनघाट मनाशी बाळगून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतोय हा उद्देश मनात ठेवून वडोली येथे परीट बांधव दरवर्षी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त किर्तन सेवा ठेवून समाज सुधारण्याचा छोटासा प्रयत्न करत आहेत.
वडोली येथील परीट समाज बांधवांच्या वतीने दरवर्षी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी कीर्तन, भजन, फराळाचे वाटप केले जाते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त परीट बांधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी तंटामुक्तीचे समितीचे मा. अध्यक्ष भैरू पिसाळ, शिवाजी जाधव, विनायक गायकवाड, परशुराम पिसाळ, शशिकांत गायकवाड, किरण गायकवाड, माऊली गायकवाड, दिनेश गायकवाड, गणेश गायकवाड, दत्तात्रय शिंदे, बाळू राऊत, हेमंत गायकवाड, रमेश मोरे, सोनू पिसाळ सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























