बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धा छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर येथे झाल्या. या स्पर्धेमध्ये शिवाजी महाविद्यालय, बार्शीच्या योगेश जाधव यांनी ६० किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी.टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारिणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी. शेख, प्रमोद जाधव, संतोष कवडे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या खेळाडूस शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हरिदास बारसकर, डॉ. विजयानंद निंबाळकर, डॉ. रामहरी नागटिळक, प्रा. संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य डॉ.ए.बी.शेख, डॉ. हरिदास बारसकर, डॉ.रामहरी नागटिळक आदी.






















