बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाच्यावतीने आंतरवासिता उपक्रमांतर्गत श्री भगवान महावीर नगरपालिका शाळा क्रमांक दोन या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनीताई कथले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बार्शी नगरपालिका प्रशासन अधिकारी भारत बावकर, पर्यवेक्षक सुरेश शिंदे, शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक गुंड, नगरपालिका शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक महेश नेवरे हे उपस्थित होते. श्री. हेमंत शाहीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षण मंडळातील मुख्याध्यापक अशोक सानप, दिनकर पाटील,. रवी मिरगणे, संजय गोरे, दत्ता सोनवणे, अमोल नलवडे आणि प्रसाद मिरगणे यांनीही उपस्थिती दर्शविली.
शालेय आंतरवासिता अंतर्गत नगरपालिका शाळा क्रमांक दोन मध्ये शनिवार दि, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, परिसर अभ्यास या विषयावर आधारित विविध प्रकारच्या शैक्षणिक साधनांची निर्मिती प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केलेली होती.या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. दीपक गुंड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. असे उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या अध्यापन कौशल्यासाठी निश्चित उपयोगी पडतात, असे सांगितले.
या शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सौ. तेजस्विनीताई कथले यांनी आपल्या मनोगतमध्ये या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना याचा फायदा निश्चितच होईल, असे मत व्यक्त केले. यानंतर या आंतरवासिता अंतर्गत राबवलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण हे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा तसेच संगीत खुर्ची स्पर्धा यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुमारी बरबडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन हे आंतरवासिता विभाग प्रमुख डॉ. साबळे व डॉ. जळकुटे जे. बी. यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक महेश नेवरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षिका श्रीमती शोभा बारबोले, श्रीमती वीणा कुरनावळ, श्रीमती आफ्रिन शेख तसेच बालवाडी विभाग प्रमुख श्रीमती परदेशी व श्रीमती मठपती यांनी विशेष परिश्रम घेतले.
























