दक्षिण सोलापूर – जिल्ह्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गंत ९७ आश्रम शाळा चालवले जात असून यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील येड्राव व अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी या आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांची इस्त्रो या अंतराळ संस्थेच्या अभ्यास दौर्यासाठी निवड झाली आहे.
जिल्ह्यातील भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थी शिकत असलेल्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची इस्त्रो या अंतराळ संशोधनात करत असलेल्या केंद्र सरकारच्या संस्थेसाठी निवड झाली आहे. येड्रावच्या आश्रम शाळेतील इयत्ता बारावीच्या सायन्समध्ये शिकत असलेला ओंकेश माने व कोन्हाळीच्या आश्रम शाळेततील इयत्ता अकरावीच्या दिशा कामाठी अशा दोन विद्यार्थ्यांची इस्रोच्या अभ्यास दौर्यासाठी निवड झाली आहे.
या निवडीमुळे विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन, उपग्रह संशोधन व वैज्ञानिक प्रक्रीयांबाबत अभ्यासाची संधी मिळणार आहे. शिवाय, विविध अंतराळ क्षेत्रात काम करत असलेल्या शासकीय संस्थांनाही भेटी देता येणार आहे.
….,
…
इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत आश्रम शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात. तसेच शाळांमध्येही अंतर्गत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना परीपूर्ण बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. संस्था, मुख्याध्यापक व प्राचार्यांची वारंवार बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना करण्यात येते. त्यामुळेच आश्रमशाळांमधील दोन विद्यार्थ्यांची इस्त्रोच्या अभ्यास दौर्यासाठी
निवड झाली आहे . विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन .
गणेश सोनटक्के, सहाय्यक संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग
























