करकंब – विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचे सन 2025-26 या हंगामाची सांगता व दोन्ही युनिटमध्ये उत्पादीत एकूण 15 लाख 11 हजार 755 व्या साखर पोत्याचे पुजन व हंगामाचा सांगता समारंभ दि.20/02/2025 रोजी कारखान्याचे फायनान्स मॅनेजर दिलीप लव्हटे व केन मॅनेजर संभाजी थिटे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचे सन 2025-26 गळीत उत्पादीत एकूण 15 लाख 11 हजार 755 व्या साखर पोत्याचे पुजन व गळीत हंगामाची सांगता दि.20/02/2025 रोजी कारखान्याचे फायनान्स मॅनेजर दिलीप लव्हटे व केन मॅनेजर संभाजी थिटे यांचे शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाचे सुरूवातीस कै.विठ्ठलराव शिंदे यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा.आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या हंगामात आजअखेर युनिट नं.1 कडे 15 लाख 52 हजार 182 मे.टन व युनिट नं.2 कडे 524451 असे एकूण 20 लाख 86 हजार 633 मे.टन ऊसाचे गाळप होवून 15 लाख 11 हजार 755 क्विंटल साखर पोती उत्पादीत झाली आहेत. दोन्ही युनिटचे मिळून 7 कोटी 09 लाख 70 हजार 500 युनिट वीज विक्री करण्यात आलेली आहे. या हंगामामध्ये युनिट नं.1 चे डिस्टीलरी विभागाकडे शुगर सिरप पासून 3 कोटी 57 लाख ब.लि. इथेनॉल उत्पादन झाले आहे. या हंगामासाठी ऊसाची उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने हंगाम लवकर बंद झाला. सर्वच कारखान्यांना ऊसाची कमतरता भासली.
तसेच या हंगामात दोन्ही युनिट कडे गाळपास आलेल्या ऊसास हंगामाचे सुरूवातीपासून 10 दिवसाला ऊस बिलाचे पेमेंट अदा केलेले आहे. या हंगामात गाळपास आलेल्या ऊसास प्रति मे.टन रू.3025/- प्रमाणे अदा करण्यात करणेत आले असून या हंगामात 10 फेब्रुवारी अखेर ऊस बिलापोटी आजअखेर रू.596 कोटी 22 लाख व 31 जानेवारी अखेर तोडणी वाहतूक बिलासाठी रू.154 कोटी 03 लाख अदा करण्यात आले आहेत. दोन्ही युनिट कडील यशस्वी कामकाजासाठी कारखान्यात काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना पंधरा दिवसाचा पगाराइतकी रक्कम बक्षिस म्हणून अदा करण्यात येणार आहे. तसेच कारखान्याचे युनिट नं.1 व 2 कडील सर्व कामगारांना त्रिपक्षीय करारानुसार माहे जानेवारी पासून 10 टक्के वाढ लागू करणेत येत आहे. हा हंगाम सभासद,ऊस पुरवठादार,ऊस तोडणी मजूर, वाहनमालक,अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्याने यशस्वी झाला असल्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे याप्रसंगी सांगितले.
सदरप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर पोपट येलपले, चिफ केमिस्ट अनिल जगताप, चिफ इंजिनिअर संजय कैचे, ईडीपी मॅनेजर रमेश खेडकर, कामगार प्रतिनिधी अनिल वीर व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
























