सांगोला – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामार्फत माऊली महाविद्यालय, वडाळा येथे कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये इंडियन गेनशिनरीयु कराटे फेडरेशनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धकांची भोपाळ, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या कराटे स्पर्धेकरता निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना सोलापूर शहर प्रमुख सुनील वाघमारे व श्वेता वाघमारे, ग्रामीण प्रमुख श्रावणी वाघमारे व निजेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी स्पर्धकांचे कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव संदीप गाडे व खजिनदार संदीप वाघचौरे तसेच स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष गौतम वाघमारे यांनी अभिनंदन केले.
सुवर्णपदक-
भगवती ठोकळे (सांगोला महाविद्यालय), निलेश गडकरी व जुनेद खान (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर)
रौप्य पदक-
अर्शद सय्यद (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज), आशिष कोकरे (स्व.गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला)


























