सांगोला – शहरातील सुशीला नांगरे पाटील यांच्या सत्त्व संचित या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्कर्ष विद्यालयाच्या सभागृहात डॉ.संजीवनी केळकर यांच्या शुभहस्ते व डॉ.कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ.सयाजीराजे मोकाशी, प्रा.पी.सी.झपके, संस्था अध्यक्ष नीलिमा कुलकर्णी, सुनील जवंजाळ, शालिनी कुलकर्णी, कवी इंद्रजीत घुले, प्राचार्य सुनील कुलकर्णी, पुष्पलता मिसाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मनोगतात डॉ.सयाजीराजे मोकाशी यांनी सांगोला हे कवितेचे गाव व्हावे असे विचार व्यक्त केले. डॉ.कृष्णा इंगोले यांनी सांगोला गाव जरी सोन्याचं असेल तरी सांगोल्याला सांस्कृतिक चेहरा मोहरा नाही जसा मंगळवेढ्याला आहे असे साहित्यिक आव्हानात्मक विचार मांडले. डॉ.संजीवनी केळकर यांनी सुशीला नांगरे पाटील यांच्या सेवेतील अध्यापन कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका स्वराली कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, शिक्षिका शुभांगी कवठेकर यांनी मान्यवरांचा परिचय, सूत्रसंचालन शिक्षिका लिंगे यांनी केले. आभार शिक्षिका बनसोडे यांनी मानले. या प्रकाशन सोहळ्यासाठी सांगोला पंचक्रोशीतून लेखक, कवी बंधू व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.


























