सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “शाक्य’, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
रंगभवन चौकजवळील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील पूर्णाकृती पुतळ्यास ”शाक्य” चे अध्यक्ष अंगद मुके, अशोककुमार दिलपाक, कैलास गायकवाड, मिलिंद कोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छ्त्रपती शिवरायांच्या पुतळ्यास सलामी देण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी शेखर वाघमारे, अंबादास बनसोडे, व्यंकटेश सोनवणे, आनंद काळोखे, गोपीचंद वाघमारे, शशिकांत बाबरे, मोतीराम गडेराव, चंद्रकांत कांबळे, ईश्वर मसलखांब, यलदास वामने, शांताराम वाघमारे आणि बहुसंख्य कार्यकर्ते, महिला मंडळ उपस्थित होते.


























