सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कृषी उपसंचालक पदावर घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शुभम सदाफुले यांचा बहुजन विचार मंचच्या वतीने रमाई अकॅडमीच्या क्लासमध्ये सत्कार करण्यात आला.
बहुजन विचार मंचचे अध्यक्ष व सेवानिवृत्त कृषी उपसंचालक आबासाहेब साबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी रमाई अकॅडमीचा विद्यार्थी स्वप्नील नडगिरी हे रेल्वे मध्ये टि.सी.पदी नियुक्ती झाल्याबद्दल नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रदीपकुमार कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ अरुणकुमार इंगळे यांनी शुभम व स्वप्नील यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. याप्रसंगी नवयान अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रदीपकुमार कांबळे, ॲड. संजीव सदाफुले, आबासाहेब साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास बहुजन विचार मंचचे उपाध्यक्ष व्ही.डी.गायकवाड , भाऊसाहेब लंकेश्वर, जितेंद्र वाघमारे, रत्नदीप कांबळे,संघपाल माने , बाबासाहेब बनसोडे, विजय खराडे, विद्याताई सदाफुले, विशाखा उबाळे व रमाई अकॅडमीचे प्राचार्य ए.ए.सोनकांबळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शाम शिंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद ताकपेरे यांनी मानले.

























