टेंभुर्णी : सेंट्रल बँक ऑफ इंडिया टेंभुर्णी शाखा, माळीनगर शाखा, पंढरपूर शाखा आणि वांगी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील करमाळा रोड, रॉयल प्लाय, टेंभुर्णी येथे कृषी कर्ज जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर प्रादेशिक व्यवस्थापक अचिंत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. तसेच केडी एक्स्पोर्टरचे संचालक किरण डोके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास विशेष पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते. माधुरी नागेश लोंढे प्रो. रॉयल अॅग्रो कोल्ड स्टोरेज, टेंभुर्णी, तानाजी काशीद प्रो. जयवंत कोल्ड स्टोरेज, पंढरपूर, मनीषा गायकवाड प्रो. एम. के. इंटरनॅशनल कोल्ड स्टोरेज, दहिवली, टेंभुर्णी, किशोर पराडे ज्योतिर्लिंग ऑटोमोटिव्ह, माळीनगर कार्यक्रमास उपस्थित सर्वांकडून उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी रॉयल अॅग्रो कोल्ड स्टोरेज आणि ज्योतिर्लिंग ऑटोमोटिव्ह यांना डीडी हस्तांतरित करण्यात आले. तसेच जयवंत कोल्ड स्टोरेज यांना मंजुरी पत्र देण्यात आले. यावेळी टें भुर्णी शाखा प्रमुख अहिल्या उत्तम देवकाते, राहुल कुशवाह शाखा व्यवस्थापक, माळीनगर मोहम्मद शेख शाखा व्यवस्थापक, पंढरपूर अभिषेक नंदन शाखा व्यवस्थापक, वांगी आदी उपस्थित होते.


























