टेंभुर्णी : माढा येथे झालेल्या शालेय विभाग स्तरीय तेंग सू डो स्पर्धेमध्ये पुणे शहराच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट अशी कामगिरी केली. पुणे शहराच्या आठ विद्यार्थ्यांची शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक मिळून निवड झाली आहे. तसेच आपल्या मिटकलवाडी ता. माढा येथील सुकन्या तेजश्री तानाजी राजगिरे हिला सुवर्णपदक मिळाले. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तेजश्री राजगिरे, शौर्य वनगे, कोमल राऊत, स्वरांजली जाधव, प्रिती राठोड, मेधा अदाटे, सौम्या ओस्तवाल, तनिष्का पवार द्वितीय क्रमांक सृष्टी थोरे, शिवप्रसाद तगारे, ओंकार सरगर, धनबहादूर बी.के, आरुष नवले तृतीय क्रमांक वेदांत इंगवले, तेजस्विनी ढोक साहिल हरले यांनी विजय मिळवले.
या सर्व विद्यार्थ्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक वैशाली बांगर यांचे मार्गदर्शन लाभले. तेजश्री राजगिरे हिचे मिटकलवाडी ग्रामस्थांचा वतीने अभिनंदन करण्यात आले.

























