सोलापूर – माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ पुणे संचलित देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापुर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर पी. एम. उषा योजना अंतर्गत आयोजित केलेल्या ९ व १३ वर्षाखालील जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरच्या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त श्रेयस कुदळे याने उत्कृष्ट खेळ करत सात पैकी साडेसहा गुणांसह व मुलींच्या गटात बार्शीच्या सान्वी गोरे हिने उल्लेखनीय कामगीरी करत पाच पैकी पाच गुण प्राप्त करत विजेतेपद व आकर्षक चषक पटकाविला. तसेच ९ वर्षाखालील मुलांच्या गटात नियान कंदीकटला सहा पैकी सहा व मंगळवेढ्याची संस्कृती जाधव हिने चार पैकी चार गुणांसह अव्वल स्थान पटकाविले. सिद्धांत कोठारी, आदिती इनानी, अथर्व दनाने, ज्ञानदा सांगुळे यांनी देखील सुरेख खेळ करत द्वितीय क्रमांक मिळविला व जिल्हा संघातील आपले स्थान निश्चित केले. विविध वयोगटात श्लोक चौधरी, पृथा ठोंबरे, आरुष माने व मेदिनी जगताप यांनी सरस खेळ करत ९ व ७ मुला-मुलींच्या गटात अव्वल स्थान प्राप्त केले.
डी. एच. बी. सोनी कॉलेज येथे येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण संस्थेचे विश्वस्त व नामवंत डॉ. गिरीश हरकुट यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्या डॉ. आशा रोकडे, नवनाथ भंडारी, संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, प्रा. प्रीती कुलकर्णी, प्रा. सुवर्णा कांबळे, सचिन खंडेलवाल, आबासाहेब भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात हरकुट यांनी बुद्धिबळाचे महत्व खेळाडू व पालकांना विषद करत खेळाडूंनी राज्य व राष्टीय पातळीवर उज्वल यश प्राप्त करून सोलापूरचा नोवलौकिक वाढवावा असे सांगितले. विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, मेडल्स तसेच सर्व सहभागी खेळाडूंना देखील प्रशस्तीपत्र व उत्तेजनार्थ मेडल्स मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत प्रमुख पंच म्हुणुन वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा-राठी, प्रशांत पिसे, विजय पंगुडवाले, यश इंगळे यांनी यशस्वीरित्या काम पाहिले.
अंतिम निकाल (अनुक्रमे गुण व बोकोल्स गुणांसह): (गट, अनुक्रमे १ ते १० क्रमांक, खेळाडूंचे नाव, गुण)
१३ वर्षे मुले: श्रेयस कुदळे – ६.५, सिद्धांत कोठारी- ६(३२), सार्थक राऊत- ६ (३१.५), आयुष जानगवळी- ६ (२९.५), वेदांत मुसळे- ५(३१), जय तुम्मा- ५(२६.५), विनय रणसुबे- ५(२६), शौर्य चंदनशिवे- ५(२३.५), हर्ष जाधव- ४.५(२७.५), वेदांत पवार- ४.५(२६.५)
१३ वर्षे मुली: सान्वी गोरे- ५, अदिती इनानी- ४(१९), प्रतीक्षा चाबुकस्वार-४(१७), सिद्धी देशमुख – ४(१३), श्रेया शिंदे – ४(११), खुशी तोंडले – ३(१४), आरोही दलाल – ३(११.५), संस्कृती लव्हाळे – ३(१०), तेजश्री उदगीरी – ३(९.५), श्रद्धा हाके – २(१३)
११ वर्षे मुले: श्लोक चौधरी – ५.५, नैतिक होटकर- ५(२९), ओम राऊत – ५(२७.५), नचिकेत तोंडले- ५(२६.५), मयूर स्वामी – ५(२६.५)
११ वर्षे मुली: पृथा ठोंबरे – ४, आर्वी सदाफुले – ३(१४), समृद्धी कसबे – ३(१३.५), तेजस्विनी कांबळे – ३(१३), सान्वी होर्तीकर- ३(११)
९ वर्षे मुले: नियान कंदीकटला – ६, अथर्व दनाने – ५(२१.५), मितांश शिंगवी – ५(२१), नमन रंगरेज – ५(१८), आर्यन गांधी – ४.५(२१.५), कृष्णराज पटाले – ४.५(२०.५), प्रज्ञांश काबरा – ४(२२.५), श्लोक सुरवसे – ४(२२), अजिंक्य कांबळे – ४(२१), विवेक स्वामी – ४(१८.५)
९ वर्षे मुली: संस्कृती जाधव – ४, ज्ञानदा सांगुळे – ३(८.५), श्रीशा हरसुर – ३(८), हर्षा क्षीरसागर – ३(७), इशा पटवर्धन – २.५(८.५), समिधा चंदनशिवे – २.५(७.५), वेदिका माडगुंडी – २(८.५), सानिका चंदनशिवे – २(८), काव्या चंदनशिवे – २(७), आसरा शेख – २(६.५)
७ वर्षे मुले: आरुष माने – ४(१६.५), लखित काबरा – ४(१५.५), विराज शेंडगे – ३(२१), ओजस पवार – ३(१५.५), मिथिलेश होर्टिकर- २(१६)
७ वर्षे मुली: मेदिनी जगताप – १(७), श्रीजा जांभळे – १(६.५)
फोटो ओळी: विजेत्या खेळाडूंसमवेत संस्थेचे विश्वस्त व नामवंत डॉ. गिरीश हरकुट, प्राचार्या डॉ. आशा रोकडे, नवनाथ भंडारी, संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे आदी.

























