पंढरपूर – ग्रामस्वच्छता व सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते थोर समाजसुधारक संत गाडगेमहाराज यांच्या जयंती निमित्ताने पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियाना मध्ये नगराध्यक्ष, पालिका कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदविला.
ग्रामस्वच्छता व सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची २३ फेब्रुवारी रोजी जयंती संपन्न झाली. त्यांच्या जयंती निमित्त सोमवारी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने शहरा मधअये स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या वतीने गाडगे महाराजांनी दिलेल्या स्वच्छतेच्या मुल्यांची जपणूक करीत त्यांना जयंती निमित्ताने आगळ्यावेगळ्या पध्दतीने अभिवादन करण्यात आले.
स्वच्छता अभियाना मध्ये जिजामाता उद्यान, गाडगेबाबा चौक आदी शहरातील भागाची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियाना मध्ये पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, पालिकेचे आजी,माजी नगरसेवक, स्विकृत सदस्य तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. विशेष म्हणजे पालिकेच्या वतीने या स्वच्छता अभियाना मध्ये नागरिकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले होते. पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध स्तरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने या अभियाना सहभागी झालेले दिसत होते.
या वेळी पालिकेच्या वतीने नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके तसेच उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी सहभागी सर्व नागरिकांचे आभार मानले. या पुढील काळात देखील अशाच प्रकारे स्वच्छता अभियान राबवुन कायम पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल असे अभिवचन पालिकेच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष यांनी यावेळी बोलताना दिले.























