सोलापूर : नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळात संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने व पर्यवेक्षक भगवान मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक माहेजबिन शेख, पर्यवेक्षक संतोष बुलबुले, सुरेश कासार, रजनी राऊळ, निलोफर सय्यद, तरंगिणी कोंडा, प्रफुल्ला कदम, महेश वालावलकर, सारंग आजीखाने, अबरार डोंगरी, तुकाराम भोसले, अविनाश शिंदे, अमोल गायकवाड, रियाज अतार, सचिन बर्मा, सौदागर वाघमारे, प्रशांत साठे, ताहीर बिराजदार, भालचंद्र साखरे, सायली ढोले, कदिर शेख आदी उपस्थित होते.
























