श्रीपुर – रोटरी क्लबचे माध्यमातून विविध सामाजीक विशेषतः आरोग्य विषयक मोफत उपचार शिबीराचे आयोजन केले जाते .
आजच्या काळात हे कार्य खुप मोठे व रुग्णांना दिलासा देणारे असल्याने ते उल्लेखनिय आहे .
असे गौरवोव्दागार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी काढले .
एच . व्ही देसाई हॉस्पीटल पुणे , रोटरी क्लब ऑफ अकलूज व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना स्थळावर मोफत नेत्र , मोतीबिन्दू शस्त्रक्रिया व मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते .
यावेळी रोटरी क्लब चे आशिष चौधरी , प्रकल्प प्रमुख पत्रकार संदीप लोणकर , डॉ .सलील तांबोळी , डॉ . सागर कोळेकर , सुभाष सोरटे , डॉ . उत्तम खरात , डॉ . सुधीर पोफळे , डॉ . प्रमोद पवार , डॉ . सुनिल फडे , कर्मयोगीचे केन मॅनेजर संतोष कुमठेकर , प्रोडक्शन मॅनेजर एम . आर . कुलकर्णी , वर्क्स मॅनेजर अमोल बारटक्के , इस्टेट मॅनेजर रमेश गाजरे , परचेस मॅनेजर महेश देशपांडे , सेकेटरी भिमराव बाबर उपस्थित होते .
या शिबीरात एकूण ३०० रुग्णांची तपासणी करण्यात आली . यात ७६ जणांना मोती बिंदू आढळून आला . या सर्वांचे मोती बिंदूचे ऑपरेशन दि . २५ फेब्रु. रोजी मोहम्मरवाडी पुणे येथे मोफत करण्यात येणार असल्याचे प्रकल्प प्रमुख संदीप लोणकर यांनी सांगितले .
प्रास्ताविकात आशिष चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत करून रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली .
सुत्रसंचालन कामगार प्रतिनिधी विजय पाटील यांनी केले .
असेल दृष्ट्री तर दिसेल सृष्टी . . .
भारताचा विचार केला तर १४० कोटी लोक संखेत सुमारे ६ कोटी नागरिकांना दृष्ट्री दोष आहे तर पन्नास लाख लोकांना दृष्टीच नाही त्यामुळे डोळे हा महत्वाचा अवयव असून वेळीच डोळ्यांच्या समस्येवर लक्ष देवून डॉक्टरांकडून उपचार करून घेणे महत्वाचे आहे . कारण दृष्ट्री असेल तरच सृष्टी दिसणार आहे .
– कार्यकारी संचालक , डॉ . यशवंत कुलकर्णी .
























