अक्कलकोट – शहर व परिसरात सोमवारी अवकाळी पावसाचा शिडकाव झाला . गहु ,हरभरा ,पिके हे काढणीला आली आहेत .या अवकाळी पावसाने द्राक्ष’ आंबा उत्पादानावर व प्रतवारीवर या पावसाने प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात आहे .
सोमवारी दिवसभर आभाळ होते . दुपारी ५ पर्यंत सुर्यदर्शन नव्हते दुपारी पाच नंतर ढगांचा गडगडाट सह अवळाळी पावसाचा शिडकाव झाला . यानंतर सुर्यदर्शन झाले . अक्कलकोट शहरासह बोरी उमरगे , निमगाव , मातनाळी’ बासलेगाव , कंठेळी , हसापुर ‘ बॅगेळी ‘ डिग्गेवाडी, सांगती आदि परिसरात अवकाळी पावसाचा शिडकाव झाला . ज्वारी ‘ हरभरा गहु ,’ जोड गहू आदि पिके काढणीला आली आहेत .
आंब्याचा मोहोर बहरून आलेला आहे कांहीं आंबा बागेत कैऱ्या छोट्या आकारात आहेत ती मोठी होण्या पुर्वीच प्रतिकुल परिस्थितीमुळे फळ बागानां फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात आहे द्राक्ष बाग , पेरू बाग ,चिक्कू आदि फळ बागेवर या प्रतिकुल हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

























