सोलापूर – साखर पेठ येथील बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुलांबिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त आयोजित एकांकिका स्पर्धेत “हा तर कचरा नव्हे तर निसर्गाची संपत्ती” या एकांकिकेचे उत्कृष्ठरित्या सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला.
विज्ञान दिनानिमित्त ग्रंथाली- प्रतिभांगण व ओंकार नाट्यमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने “विज्ञानधारा” विज्ञान विकास स्पर्धेत हिंगुलांबिका प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. रोख ५ हजार रुपये व पुस्तके असे त्याचे स्वरूप आहे.
या विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री बापू ढगे, सचिव विजय पुकाळे, विद्यानिकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गोपी नवले, पर्यवेक्षक शंकरगिरी गिरी, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री प्रमोद हंचाटे व उपस्थित पालकांच्या वतीने अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना सहशिक्षक श्री अश्विन संगवे व एलिझाबेथ एकादशी, कागर, इडक, दुसरी गोष्ट, चि. व चि. सौ. का. अशा अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणारे सोलापूरचे कलाकार श्री अमोल राजमाने व श्री धनंजय गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले.






















