सोलापूर – आस्था रोटी बँकेतर्फे संत गाडगेबाबा महाराज यांच्या 150 वी जयंती निमित्त दत्त चौकामधील संत गाडगेबाबा महाराज यांच्या मूर्तीस पूजा करण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वच्छता मोहीम करत तेथील गोरगरीब गरजू लोकांना, तसेच पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.
संत गाडगेबाबा महाराज यांनी समाजासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून पंकज जाधव व सिद्धेश्वर कळकेरी व तसेच ब्लड बँकेचे विनायक कुलकर्णी आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छचुरे यांची होती. आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते विनोद भोसले दत्तात्रय दळवी अनिता तालीकोटी गीता दळवी विजय छचुरे इतर कार्यकर्ते उपस्थितीत होते.
























