पंढरपूर – अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रचारासाठी सदैव कार्यरत असलेल्या तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे,आरती साऊंड सिस्टीम मनमाडकर परिवार आणि नादब्रह्म कला फाऊंडेशन करकंब यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत येत्या शनिवार (दि.२८) आणि रविवारी (दि.१ मार्च) सायंकाळी ५:३० वाजता आरती मंडप प्रांगण भक्तीमार्ग श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे नादब्रह्मचे ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले.
या महोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक, राणा महाराज वासकर,पं.शौनक अभिषेकी, भगवान मनमाडकर शुभांगी मनमाडकर,ज्ञानेश्वर दुधाणे यांचे हस्ते होणार आहे.
या महोत्सवात पहिल्या दिवशी उदयोन्मुख गायक राज शहा ,अनुजा झोकरकर यांचे गायन तर पं.पद्मश्री तालयोगी सुरेश तळवलकर यांचे शिष्य पं.रामदास पळसुले यांचे एकल तबलावादन संपन्न होणार असून दुसऱ्या दिवशी करणं देवगावकर गायन, सारंग कुलकर्णी यांचे सरोदवादन तर संगीत महोत्सवाची सांगता पं.शौनक अभिषेकी यांच्या गायनाने होणार असून या महोत्सवात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रचारासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या कलासाधकास कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत सेवा सन्मान पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार यंदा रामदास नाना रोंगे यांना दिला आहे.
दरम्यान संगीत मैफलीत सर्व दिग्गज कलाकारांना तबला अजिंक्य जोशी,कार्तिक स्वामी, माऊली खरात, हार्मोनियम यश खडके, सारंग कुलकर्णी, ओंकार पाठक, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे तर टाळ माऊली पिसे सुदर्शन कुंभार आदी साथसंगत करणार असून ध्वनी व्यवस्था आरती साऊंड सिस्टीम यांची असणार आहे. तरी पंढरपूर आणि पंचक्रोशीतील कलासाधक आणि कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भगवान मनमाडकर, ज्ञानेश्वर दुधाणे, यांनी केले आहे.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी अभेद अभिषेकी, धनंजय मनमाडकर, संकेत कुलकर्णी,वैभव केंगार, माऊली खरात,सुदर्शन कुंभार,सर्व कलासाधक आदी अधिक परिश्रम घेत आहेत.























