सोलापूर – शहर व सोलापूर जिल्हयातून ०२ वर्षाकरीता अरुण प्रभाकर रोडगे यास तडीपार करण्यात आले आहे. असे आदेश पोलीस आयुक्तालयातून काढण्यात आले आहेत.
अरुण प्रभाकर रोडगे, वय ५७ वर्षे, रा. १५३, मुरारजी पेठ, मंगळवेढेकर चाळ, सोलापूर याचेविरुध्द सन २०२३, २०२४, २०२५ व २०२६ या कालावधीमध्ये सामान्य नागरीकांना साथीदारांसह मारहाण करुन दमदाटी करणे, सामान्य नागरीकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, अवैध व्यवसाय (मटका जुगार) चालवून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द सलगर वस्ती पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस आयुक्त, एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ५५७/२०२६ दि.२५/०२/२०२६ अन्वये, इसम नामे, अरुण प्रभाकर रोडगे, वय ५७ वर्षे, रा. १५३, मुरारजी पेठ, मंगळवेढेकर चाळ, सोलापूर यास सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.
























