सोलापूर – दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतुहल निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी व्हॅलेंटाईन सर्कल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जी एच यांच्या हस्ते करण्यात आले. थोर वैज्ञानिक सी व्ही रमण यांच्या प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ गायत्री कामुनी यांनी दिनविशेष सांगितले. अनेक विद्यार्थी आपल्या भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले.
या दिवशी चित्रकलांचे प्रदर्शन व प्रयोगाच्या मार्गदर्शनात रीवर क्लीनिंग, स्मार्ट ॲग्रीकल्चर, ह्युमन इंटरनल सिस्टम, ॲक्सिडंट सेंसर कार, अर्थके आलाराम, सोलार सिस्टम, रोबोट लिफ्ट, स्मार्ट व ग्रीन सिटी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, यांसारख्या बरेच प्रतिकृती, भिंतीपत्रकांचे प्रदर्शन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. विजयी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे गुणवंत विज्ञान शिक्षिका सौ मेहजबीन शेख, सौ स्वेता येमेकर, कामाक्षी गड्डम, पूजा मानेकरी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जी एच उपमुख्याध्यापिका मिना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनिता मंद्रुपकर व नागमणी पेगडा व सुप्रिया बोम्मा क्रीडा विभाग प्रमुख श्री संतोष पाटील तसेच शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापूरे उपाध्यक्ष सौ यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे यांनी कौतुक केले

























