सोलापूर – ‘निमंत्रित बॅडमिंटन स्पर्धेत खुल्या गटात गणेश दुलंगे व प्रपती राठी यांनी अजिंक्यपद पटकाविले. माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयात ९ ते १७ वर्षांखालील आणि खुला गट अशा विविध वयोगटांसाठी ‘निमंत्रित बॅडमिंटन स्पर्धेचे’ शानदार आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि ‘पीएम-उषा’ उपक्रमांतर्गत ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे चेअरमन मधुसूदन करवा आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संचालिका डॉ. वासंती अय्यर, क्रीडा संचालिका सुवर्णा कांबळे, प्रशिक्षक अर्शीद शेख, प्रमुख पंच म्हुणुन आर्शीन शेख, श्रीराम, डॉ. मोरे, चित्राली आदी उपस्थित होते.
——-
अंतिम निकाल एकेरी ( विजेता व उपविजेता)
९ वर्षांखालील मुले : केतन हेबाले, विहान कुलकर्णी. मुली : जुनैरा अत्तार, ईश्वरी येलावे.
११ वर्षांखालील मुले : असद शेख, आदित्य पवार. मुली : ओसिन अरखाराव, मरियम होटगी.
१३ वर्षांखालील मुले : यश मोरे, अथर्व व्हटकर. मुली : आराध्या सावंत, अन्वी शाह.
१५ वर्षांखालील मुले : मिहिर लोणावत, कार्तिक चिंचोरे. मुली : अर्विता कुलकर्णी, आरोशी घाडगे.
१७ वर्षांखालील मुले : सई परदेशी, समर्थ ढवळे. मुली : संस्कृती स्वामी, काव्या दावडा.
खुला मुले : गणेश दुलंगे, कुंदन वेर्णेकर. मुली : प्रपती राठी, सृष्टी वाघमारे.

























