श्रीपूर – नेवरे ता . माळशिरस येथिल जिल्हा परिषद शाळेस गुणवत्तेच्या आधारावर अव्वल (SQAAF -school Qualit Assessmentand Accreditation Framework ) मानांकन प्राप्त झाले आहे अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक नाथसिंह देशमुख यांनी दिली .
अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले की , नेवरे शाळेने शासन शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांचे मुल्यमापन होत असते यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांची व्यावसायिक गुणवत्ता , विद्यार्थ्यांचा विकास , शाळा व्यवस्थापन व नेतृत्व , पायाभूत सुविधा व सुरक्षितता , पालक व समुदाय सहभाग व शैक्षणिक गुणवत्ता या बाबींची निकषावर मुल्यमापन ठरवले जाते राज्यातील १ लाख २ हजार ६७५ शाळा पैकी ४२९ शाळांना ए + मानांकन मिळाले तर माळशिरस तालुक्यातील नेवरे ही एक मेव शाळा मुल्यांकनास प्राप्त ठरली आहे . एकूणच सर्व शिक्षक व ग्रामस्थां साठी अभिमानाची गोष्ट आहे .
शाळेच्या या यशाबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी अस्लम इनामदार यांनी कौतुक करून अभिनंदन केले .
या प्रसंगी केंद्रप्रमुख दिनकर दळवी , अमर श्रीमंत गोसावी , संजय पांडुरंग जाधव , जामोद बाबू खोत, विजयकुमार गोविंद हजारे , उत्तम मारुती कुदळे , अमोल तानाजी सोपनर , तुकाराम कृष्ण कचरे , निदेशक सचिन कारंडे , सचिन जाधव , अमोल कदम , शाळा समिती अध्यक्ष दयानंद कालिदास पाटील , उपाध्यक्ष जोतीराम भगवान बोबडे , उपस्थित होते .

























