Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाविकांना उन्हाचे चटके बसु नयेत यासाठी उन्हापासून बचावासाठी वाळवंटात तात्पुरत्या व्यवस्थेची गरज

तरुण भारतbyतरुण भारत
February 26, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. येथील चंद्रभागेच्या वाळंवटा मध्ये उन्हामुळे भाविकांच्या पायांना चटके बसत आहेत. उन्हाळ्यात भाविकांच्या पायाला चटक्यांचा त्रास होणार नाही अशी कोणतीही व्यवस्था प्रशासनाच्या वतीने सध्या वाळवंटा मध्ये उपलब्ध नाही. चैत्री यात्रा देखील जवळ आलेली आहे. यात्रे मध्ये भाविकांची वाळवंटात मांदियाळी असते. रणरणत्या उन्हाचा भाविकांना कमालीचा त्रास होत असतो. त्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात जुना दगडी पुल ते चंद्रभागा घाट या दरम्यान प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी भाविकांमधून जोर धरीत आहे. 


पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्र आहे. अध्यात्मिक राजधानी म्हणून देखील या पंढरीचा महिमा सर्वदूर वर्णिला जातो. त्यामुळेच वर्षभरातील चार यात्रांशिवाय ऐरव्हीच्या एकादशीला देखील भाविकांची येथे मोठी मांदियाळी असते. यामध्येच लागून सुट्या आल्या नंतर कुटुंबियांसह अनेक भाविक दर्शनासाठी येथे दाखल होत असतात. चंद्रभागेचे स्नान, विठुरायाचे दर्शन आणि नगरप्रदक्षिणा या गोष्टींना वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.


दरम्यान सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेले आहेत. यामध्येच सुर्य देखील दिवसेंदिवस कमालीची आग ओकताना दिसत आहे. दुपारच्या वेळी चंद्रभागेच्या वाळवंटा मधील वाळू एखाद्या आगीच्या निखाऱ्या प्रमाणे तापत आहे. या मध्येच परगावाहून आलेले भाविक अगदी जुन्या दगडी पुला जवळ उतरुन मोठ्या श्रध्देने वाळवंटा मध्ये अनवाणी पायाने चालत चंद्रभागा स्नान तसेच पुंडलिक दर्शनासाठी दाखल होत असतात. काही जण तर भर उन्हात दुपारी देखील नगरप्रदक्षिणा करीत असतात. त्यामुळे भाविकांना उन्हाचा मोठा त्रास होतो. मात्र प्रशासनाच्या वतीने भाविकांना निवारा उपलब्ध व्हावा यासाठी वाळवंटा मध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही.
—————————– 

मालकी ऐकाची आणि जबाबदारी दुसऱ्याची
कारण चंद्रभागेच्या पाण्यावर पाटबंधारे विभागाची मालकी आहे. पात्रातील वाळूवर महसूलची आणि वाळवंटाच्या स्वच्छतेची जबाबदारी पालिकेवर आणि मंदिर समिती प्रशासनावर टाकलेली आहे. त्यामुळे भाविकांना वाळवंटा मध्ये सोयीसुविधा देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न निर्माण होत आहे.
———————————-

शासकीय विभागात समन्वयाची गरज
सोयीसुविधा पुरविण्यावरुन महसुल, पाटबंधारे आणि पालिका तसेच मंदिर समिती प्रशासन या विभागाच्या वादा मध्ये भाविकांचे चंद्रभागा वाळवंटा मध्ये विविध समस्यांनी सध्या भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. वाळवंटात जुन्या दगडी पुला पासून ते पुंडलिक मंदिर पर्यंत साधारणपणे एक ते दीड किलोमीटर ऐवढे अंतर आहे. कडक उन्हा मध्ये देखील भाविक अनवाणी पायाने हे अंतर पार करीत असतात. त्यामुळे पाटबंधारे, महसूल, पालिका आणि मंदिर प्रशासन या विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय साधुन ऐवढ्या अंतरापुरती भाविकांसाठी सावलीची व्यवस्था करावी अशी मागणी सध्या जोर धरीत आहे. 
—————————-

तात्पुरत्या या उपाय योजना आहेत शक्य
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यात्रांच्या काळात पदस्पर्श दर्शन रांगेवर ज्या प्रमाणे प्लास्टिक पेपर अथवा पत्रे टाकते तशी वाळवंटात घाटाच्या बाजूला व्यवस्था करणे शक्य आहे. या बरोबरच विठ्ठल मंदिराच्या महाव्दार आणि पश्चिमव्दारा मध्ये स्थानिक व्यापारी ज्या प्रमाणे शेडनेटचा मांडव उभा करतात तशा पध्दतीने देखील वाळवंटा मध्ये तात्पुरत्या स्वरुपात मांडवाची व्यवस्था केल्या भाविकांना उन्हा पासून त्रास होणार नाही. कायमस्वरुपी देखील घाटाच्या बाजूला रस्ता करुन त्यावर पत्र्यांचे अच्छादन करुन जमीनीवर उष्णतारोधक पांढऱ्या रंगाचा विशिष्ट आँईलपेंट देखी लावता येवू शकतो. या प्रकारच्या व्यवस्थेचा खर्च विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून देखील करता येवू शकतो.
———————–

चैत्री यात्रेत भाविकांची वाळवंटात असते मांदियाळी
चैत्री यात्रा ही पळती यात्रा असते असे म्हटले जाते. कारण या यात्रे मध्ये अनेक भाविक हे कावडीसह येथे विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. कावडींना चंद्रभागा स्नान घालून हे भाविक नगरप्रदक्षिणा, विठ्ठलरुक्मिणीचे दर्शन करुन पुढे शिंगणापूराकडे जात असतात. त्यामुळे कावडी घेऊन येणाऱ्या भाविकांची चैत्री यात्रेच्या काळात वाळवंटात मोठी गर्दी असते. त्यामुळे चैत्राच्या उन्हात या भाविकांचे वाळवंटात कमालीचे हाल होत असतात.
———————————

चंद्रभागेच्या वाळवंटा मध्ये स्नानासाठी आलेलो आहे.वाळवंटा मध्ये उन्हामुळे अक्षरश: पायाला चकटे बसतात.प्रशासनाने काही तरी व्यवस्था करणं गरजेचं आहे.
गजानन आसबे ( भाविक )
—————————

Post Views: 14
Previous Post

अन्यायाविरोधातील भूमिका पुढे नेण्यासाठी गोविंद पानसरे यांचे विचार समजून घ्यावे लागतील – डॉ. कदम

Next Post

एपस्टाईन प्रकरण, भारत–अमेरिका करार व धमकी-हल्ल्यांविरोधात सोलापूर काँग्रेसचे आंदोलन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एपस्टाईन प्रकरण, भारत–अमेरिका करार व धमकी-हल्ल्यांविरोधात सोलापूर काँग्रेसचे आंदोलन

ताज्या बातम्या

पंढरीत चिमुकलीने केला रोजाचा उपवास 

February 26, 2026

एन.एम.एम.एस. स्पर्धेत विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेचे यश

February 26, 2026

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू.इंग्लिश स्कूलने मिळविले घवघवीत यश

February 26, 2026

मंगळवेढा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत विविध कामांना मंजुरी 

February 26, 2026

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रवीण भांगे प्रथम क्रमांक

February 26, 2026

कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने अभिनेते अंकुश आतकर सन्मानित

February 26, 2026

घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपास सुरुवात

February 26, 2026

दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये “सुंदर मला व्हायचंय” या विषयावर विशेष सेमिनार संपन्न

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0705097

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697