सोलापूर – शहरात शुक्रवारी सायंकाळी हिराचंद नेमीचंद वाचनालयात लोकमान्य सभागृहातील कवी कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा दिन निमित्त सोलापुरातील कवी रा.ना पवार, कवी संजीव कवी माधव पवार यांच्या मनाला भावणाऱ्या कवितांचा वेणू गोपाल संगीत विद्यालय सोलापूर प्रस्तुत तुझ्या आषाढाची याद…! भावगीत संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला.
सोलापुरातील कलाकार संगीत संयोजन सौ शर्वरी कुलकर्णी व झंकार कुलकर्णी गायक कलाकार कुमारी सर्वदा मोहोळकर, रूपक कुलकर्णी, पियुष आवारे, साथ संगत केदार गुळवणी कोल्हापूर (व्हायोलिन), जयेश कुलकर्णी (बासरी), कौस्तुभ चांगभले (तबला), द्वारकेश कलशेट्टी (साईड रिदम), निवेदन आदिती कुलकर्णी. यांनी केले याप्रसंगी सोलापुरातील रसिक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
———————————————-
फोटो ओळी : सोलापूर शहरात शुक्रवारी सायंकाळी कवी कुसुमाग्रज व मराठी भाषा दिन निमित्त हिराचंद नेमचंद वाचनालय लोकमान्य टिळक सभागृहात वेणू गोपाळ संगीत विद्यालय प्रस्तुत तुझ्या आषाढाची याद….! मराठी संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला






















