बार्शी – मुद्रक संघाची सर्वसाधारण शुक्रवारी सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष दिपक कुणके, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव संतोष तोडकरी तर खजिनदार ज्ञानेश्वर बोबडे यांची निवड करण्यात आली.
मुद्रकांसाठी भरीव काम करण्याची अपेक्षा सर्व सदस्यांनी व्यक्त केली तर अध्यक्षीय भाषणात मुद्रण क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान याचा उपयोग करुन मुद्रण क्षेत्रातील व्यवसायीकांना माहिती मिळण्यासाठी सर्व मुद्रकांमध्ये समन्वय साधून विविध उपक्रम राबवु, मुद्रण क्षेत्रातील मोठ्या व्यवसायीकांशी समन्वय साधून बार्शी मुद्रण हब बनविण्यासाठी प्रयत्न करणार, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संतोष दोशी, शंकरराव लटके, नंदकिशोर राऊत, पियुष कोटेचा, महादेव चव्हाण, साईनाथ साखरे, राहुल भालके, अमोल आजबे, किरण गुरसुळकर, विजय वायचळ, विनोद घाडगे, बालाजी पाटील, आप्पा नायकोजी, सागर मुके, सागर काशीवद, युवराज जाधव, करीम जिनेरी, महेश सोनार, सचिन आजबे, गुरु साखरे, बंडू चव्हाण, अनिरुद्ध सासवडे आदि उपस्थित होते.



















