सांगोला – राजे रामराव महाविद्यालय, जत, जि.सांगली येथे आयोजित इमर्जिंग ट्रेंड्स इन इंटर-डिसिप्लिनरी सायंटिफिक रिसर्च फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावरील राष्ट्रीय परिषदेमध्ये सांगोला महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रणाली उमराणीकर हिने आयोनिक लिक्विड सपोर्टेड फेज कॅटेलाइज्ड मल्टी कंपोनंट सिंथेसिस, बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन अँड इन सिलिको स्टडीज ऑफ पायरॅनो पिरिमिडीनस हा संशोधन पेपर सादर केला. उपस्थित तज्ञांकडून सदर पेपर प्रेझेंटेशनसाठी प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले.
सदर पारितोषिक शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.जी.बी.कोळेकर व प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांचे हस्ते देण्यात आले. तिच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड, सेक्रेटरी ऍड.उदयबापू घोंगडे, संस्था उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रकाश पाटील यांनी अभिनंदन केले.
प्रणाली उमराणीकर ही महाविद्यालयाचे प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिरिमिडीन संबंधित संयुगे व त्यांचा मधुमेह व कॅन्सर सारख्या असाध्य रोगांसाठी औषध निर्मितीसाठी वापर याविषयी पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करीत आहे.




















