अक्कलकोट – तालुक्यात आकांक्षित कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी विविध विकासात्मक उपक्रमांच्या आढावा घेण्यासाठी निती आयोगाच्या सल्लागार श्रीमती मुग्धा नरकर यांनी भेटी देऊन अक्कलकोट तालुक्यात दौरा केल्या.
पंचायत समिती अक्कलकोट येथे तालुकास्तरावरील अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या दरम्यान
श्रीमती मुग्धा नरकर यांनी उपस्थितींना मार्गदर्शन करून संपूर्णतः अभियान २.० यी ६ निर्देशांक यशस्वीरित्या साध्य करण्यासाठी विभागीय समन्वयक, नियमित देखरेख, मैदानी फॉलो अप तसेच नियोजित कृती आराखडा चाली प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी समुदाय सहभागाला समावेश करणे गरजेचे असल्याची सांगितल्या.
त्यांनी सर्व विभागांना निर्धारित उदिष्टे व निकषांनुसार वेळेने कार्यवाही करण्याचे, नबोध नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे निर्देष दिले. तसेच डेटा आधारित नियोजन व सातत्यपूर्ण मूल्यांकन प्रणाली अधिक सक्षम करण्यावर त्यांनी विशेष भर देण्याबाबत सांगितले.
दरम्यान श्रीमती मुग्धा नरकर यांनी जेऊर येथील ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, एएनसी नोंदणी तपासणी, प्रसूतीगृहाची व्यवस्था, उच्च जोखीम गर्भवती महिलांची ओळख व त्यांच्यासाठी उपलब्ध सेवांची प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी संपूर्णतः अभियान २.० च्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्रामध्ये शौचालय उपलब्धतता, पाण्याची सुविधा, आहार वाटप, बालकांचे पोषण व्यवस्थापन, मुलांसाठी पूरक पोषण योजनेतंर्गत दिल्या जाणाऱ्या योजनांची व्यवस्था, बालकांच्या वाढ, मोजमाप (ग्रोथ मॉनिटरिंग), पूर्व शिक्षणाची गुणवत्ता इ. बाबींचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकरी, तालुका आरोग्य अधिकारी, उप अभियंता ग्रमीण पाणी पुरवठा, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग पंचायत समिनी, गावचे उप सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, उमेद अभियानाचे तालुका अभियान बलस्थापक यांची उपस्थिती होती.




















