Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ मंजूर, कोणतीही करवाढ व दरवाढ नाही

तरुण भारतbyतरुण भारत
February 28, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी –  नगर परिषदेचा सन २०२६-२७ चा ६९८ कोटी १२ लाख १३ हजार १४७ रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी कै. भाऊसाहेब झाडबुके सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तब्बल तीन तास चाललेल्या या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी, आरोप-प्रत्यारोप झाले.

सभेच्या प्रारंभी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष तेजस्विनी कथले यांनी अर्थसंकल्प सादर करताना अभिभाषणात महिलांना केंद्रस्थानी ठेवून, शहराचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने कोणतीही करवाढ व दरवाढ न करता हा अर्थसंकल्प मांडल्याचे सांगितले. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अर्थसंकल्पात शासनाकडून प्राप्त होणारे विविध प्रकारचे अनुदानित अंशदानी तसेच विविध योजना अंतर्गत कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य इत्यादी द्वारे ४९८ कोटी ७१ लाख ४२ हजार भांडवली जमेस धरून नगरपरिषदेचा सन २०२६- २७ मध्ये एकूण ५१२ कोटी ८६ लाख ४२ हजार ४०४ रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलेले आहे. प्रारंभिक शिल्लक जमा धरता एकूण ६९८ कोटी १२  लाख १३  हजार १४७ रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी तब्बल ४३ मिनिटांचे अभ्यासपूर्ण भाषण करत महसुली व भांडवली जमा यामध्ये आकडे फुगवून सादर केल्याचा आरोप केला. अधिकारी वर्ग सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांची दिशाभूल करत असे आहेत का ? असा सवाल केला. 

अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा तक्ता नसून शहराच्या विकासाचा कायदेशीर आराखडा आहे. कररुपी पैसा हा जनतेचा असून आपण त्याचे विश्वस्त आहोत, असे त्यांनी नमूद केले. जिल्हा नियोजन समितीचे बजेट सुमारे ७०० कोटी असताना बार्शी नगरपरिषदेचा ६९८ कोटींचा अर्थसंकल्प वास्तववादी नसल्याची टीका त्यांनी केली.

अनेक योजनांना प्रशासकीय, तांत्रिक मान्यता नसताना तरतुद दाखविल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

         

बार्शी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात २५% देवस्थान, २५% नगरपरिषद व ५०% राज्य शासन निधी अशी तरतूद असल्याचे सांगत आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.

 उजनी पाणीपुरवठा योजनेच्या नवीन पाइपलाईन संदर्भात शासनाकडून ८०% अनुदान अपेक्षित असताना संबंधित ठेकेदारास ८०% पेक्षा अधिक बिल अदा झाल्याचा आरोप करत संभाव्य अनियमिततेचा संशय त्यांनी व्यक्त केला.

अक्कलकोटे यांनी अर्थसंकल्पात खालील विषयांवर तरतूद करण्याची मागणी केली

शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तरतूद करावी

वाहतूक समस्येसाठी सिग्नल व्यवस्था वाढवावी. पर्यावरण संवर्धन व धूळ प्रदूषणावर भरीव उपाययोजना. सामाजिक संस्थांना स्मशानभूमी, शाळा व बगीचा दत्तक देण्याची योजना. बार्शी शहरातील बारा ज्योतिर्लिंग असलेल्या परिसरातील रस्त्यांवर कमानी उभाराव्यात.  दस्तगीर दर्ग्याच्या दुरुस्तीसाठी निधी. 

विजय राऊत यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

या अर्थसंकल्पात बार्शी शहराचा “सर्वांगीण विकासाचा रोडमॅप तयार केला असल्याचे विजय राऊत यांनी सांगितले. अर्थसंकल्पाचे स्वागत करत शहरातील प्रत्येक भागातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसेच निधी वाटपात भेदभाव होणार नाही, अशी ग्वाही दिली. शासनाच्या योजना 100% राबविण्याचा प्रयत्न होईल, असेही त्यांनी सांगितले. महिलांसाठी अलीपुर रोड व उपळाई रोड येथे नवीन स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणा त्यांनी केली.

        सभागृहात खडाजंगी

माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी हा अर्थसंकल्प नियोजनशून्य व भ्रष्टाचाराने भरलेला असल्याचा आरोप करत गटार दुरुस्ती, भुयारी गटार योजना, घरपट्टी-नळपट्टी वसुलीतील तफावत, अपूर्ण कामे यांवर प्रश्न उपस्थित केले.

यावर सत्ताधारी नगरसेवक विजय चव्हाण, संदेश काकडे, दीपक राऊत, अमोल चव्हाण, भैय्या बारंगुळे व उपनगराध्यक्ष रोहित पाटील यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिल्याने काही काळ सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

       विद्या बंगाळे यांची समज

गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका विद्या बंगाळे यांनी सभागृहाचे गांभीर्य राखण्याचे आवाहन केले. ५०% महिला सदस्य उपस्थित असताना अशा प्रकारचा गोंधळ योग्य नाही. प्रत्येक सदस्याला बोलण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

 सभागृहात विरोधी नगरसेवक ज्योतिर्लिंग कसबे, आणि विद्या बंगाळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेतून ११ कोटीची तरतूद आहे तर याच ठिकाणी हा खर्च व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. भीम नगर, सिद्धार्थ नगर आणि अण्णाभाऊ साठे नगर या भागात नव्याने गटारी आणि सिमेंट रस्ते व इतर मूलभूत सुविधा व्हाव्यात, अशी जोरदार मागणी  नगरसेवक ज्योतिर्लिंग कसबे आणि विद्या बंगाळे यांनी केली. 

त्यांनी दलित वस्त्या, महिला व सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले.

       महिला व बालकल्याणावर भर

 सत्ताधारी नगरसेविका कांचन मोहिते यांनी महिला व बालकल्याण विषयक योजनांमध्ये अधिक तरतूद करण्याची मागणी केली. विरोधी नगरसेवक अनिकेत कारंडे यांनी पाणीपुरवठा विभागातील वाल्व ओपनरवरील वाढत्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला. संदेश काकडे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी योग्य असल्याचे स्पष्ट केले.

 या सभेत नगरसेवक भारत पवार, महेदिमियां लांडगे, सायरा मुल्ला, रागिनी पाचपुते, आकाश राऊत, मुज्जमिल पठाण आदींनी सहभाग घेतला.

Post Views: 107
Previous Post

पाच घरफोडी केलेला सराईत आरोपी जेरबंद

Next Post

एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरांची अविस्मरणीय मैफल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरांची अविस्मरणीय मैफल

ताज्या बातम्या

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

June 5, 2026
शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

June 5, 2026
एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

June 5, 2026

शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदांच्या १००% भरतीसाठी ८ जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

June 5, 2026
‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

June 5, 2026
मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

June 5, 2026
स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

June 5, 2026

 ‘एन.जी. रेड’ आणि ‘साऊथ सोलापूर ब्ल्यू’ संघांचे शानदार विजय

June 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0895484

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697