अक्कलकोट – जनतेने शिवसेनेवर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मंत्रालयात येताना ठोस प्रस्ताव आणि विकासकामांची यादी घेऊन या. जनतेचे कामे सांगा, मी कामासाठी कुठेही कमी पडणार नाही. अक्कलकोटच्या प्रगतीसाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोटच्या शिष्टमंडळाला दिले.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. वागदरी जिल्हा परिषद गटातून प्रवीण तानवडे व शिवराज म्हेत्रे हे सलगर जिल्हा परिषद मतदार संघातून विजय संपादन केल्याबद्दल शिवसेनेचे नेते माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे व लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, माजी जिल्हा परिषद पक्ष नेता आनंद तानवडे यांच्या प्रमुख उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतला. त्यावेळी त्यांनी स्थानिक नेतृत्वाला बळ दिले असून शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी मंत्रालयस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगत तालुक्याचा विकासाचा शब्द दिला.
यानंतर मुंबई येथे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते रोजगार हमी योजना मंत्री ना. भरत शेठ गोगावले यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतले.यावेळी प्रवीण तानवडे व शिवराज म्हेत्रे हे जिल्हा परिषद निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल मंत्री गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भविष्यात शिवसेना अधिक कसे भक्कम होईल यासाठी चर्चा झाली. शेती रस्ते चे कामे गावअंतर्गतील कामे व इतर कुठलेही कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी लिंगराज स्वामी,प्रशांत तानवडे , नूतन पंचायत समिती सदस्य गणेश मोरे,अनिल जिरगे, संजय होळे , सुशील फुलारी ,रामेश्वर पाटील, मदन राठोड, राजू राठोड, संगप्पा चानकोटे, दीपक कवडे, विजय बिराजदार, , इराया स्वामी, बसवराज मंजुळकर, अँड अमित कोथिंबीरे आधी शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ओळ
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीप्रसंगी सिध्दाराम म्हेत्रे, प्रवीण तानवडे, आनंद तानवडे, शिवराज म्हेत्रे, प्रशांत तानवडे व अन्य.




















