सांगोला – शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सहसंपर्क प्रमुखपदी सांगोलचे सतीश सावंत यांची निवड करण्यात आली असून कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात १० टक्के राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णता मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करणे संदर्भातील मार्गदर्शन करून सदैव तत्पर राहावे. तसेच गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब रुग्णांना भरीव प्रमाणात आर्थिक सहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयात संपर्क साधावा असे या पत्रात संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे व कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी नमूद केले आहे. सदर निवडी नंतर सतीश सावंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
लवकरच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सांगोला तहसील कार्यालयासमोरील संपर्क कार्यालयात रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध राहुन रुग्णांना मदत करणार आहे.
– सतीश सावंत, सहसंपर्क प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र




















