वेळापूर – येथील इंग्लिश स्कूल, वेळापूर प्रशालेत २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी शब्दसम्राट विष्णू वामन शिरवाडकर व दलितमित्र कदम गुरुजी यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक पठाण शिवशरण हे होते . यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश पवार , पर्यवेक्षक बापूसाहेब सावळे व सर्व मराठी विषय शिक्षक उपस्थित होते .
विद्यार्थी व अध्यक्षीय मनोगतांमध्ये मराठी भाषेबद्दल विचार व्यक्त केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश कदम व सौ जयश्री देवकते यांनी केले तर आभार नागणे सर यांनी मानले .



















