माढा : भारत आणि अमेरिका कार्यक्षेत्र असलेल्या इन्साईट सक्सेस या संस्थेचा मानाचा प्राईड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार दारफळ सीना येथील प्रसिद्ध चित्रकार रत्नदिप बारबोले यांना काल पुणे येथील रेडिसन ब्ल्यू पंचतारांकित हॉटेलमध्ये, मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दारफळ सीना येथील प्रसिद्ध चित्रकार रत्नदिप बारबोले यांना मागील महिन्यात “प्राईड ऑफ महाराष्ट्र 2026” या पुरस्कार जाहीर झाला होता .आज तो मानाचा पुरस्कार रत्नदिप बारबोले यांना प्रदान करण्यात आला ..! भारत आणि अमेरिका मध्ये कार्यरत असलेल्या इन्साईट सक्सेस या संस्थेचा हा पुरस्कार असून पुणे येथील रेडिसन ब्ल्यू या हॉटेल मध्ये दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण झाले ..! आज पर्यंत देशविदेशात चित्रकार बारबोले यांचे चित्रप्रदर्शन झाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रिय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार बारबोले यांना मिळाले आहेत. त्याच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल बारबोले यांना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.विविध क्षेत्रातील मान्यवरांचा याठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.रोख रक्कम,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावेळी इन्साईट सक्सेस चे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार माझे वडील स्व.बळीराम बारबोले व माझे गुरु स्व.कांबळे सर यांच्या चरणी अर्पण.सर्व कलारसिक मायबाप मनापासून धन्यवाद.
चित्रकार रत्नदिप बळीराम बारबोले.



















