कुर्डूवाडी – आदर्श पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,कुर्डूवाडी येथील विद्यार्थ्यांनी JEE मेन परीक्षामध्ये उल्लेखनीय यश संपादन करून ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्कृष्ट टक्केवारीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
यामध्ये सुमेध हिवराळे याने 90.33 पर्सेंटाइल, आकाश नाईकुडे याने 80.00पर्सेंटाइल, तर कृष्णा ढेकळे याने 75.00पर्सेंटाइल मिळवून यश संपादन केले. विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे, चिकाटीचे तसेच गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचे फलित आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अमोल सुरवसे प्रकल्प संचालिका मा. पूजा सुरवसे ,प्राचार्य शकिलाबी सय्यद व शिक्षकवृंद पालकानी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




















