Saturday, February 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कॉरिडोरसाठी दहा कोटीची तरतूद तर दूसरीकडे कॉरिडोरच्या विषयाला स्थगिती

तरुण भारतbyतरुण भारत
February 28, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – नगरपरिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकीकडे प्रशासकीय स्तरावर पालिकेच्या अर्थसंकल्पात पंढरपूर कॉरिडोरसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद  करण्यात आली तर दूसरीकडे याच सर्वसाधारण सभेत पालिकेतील सदस्यांकडून पंढरपूर कॉरिडोरच्या विषयाची राज्य शासनाकडून पालिकेला सविस्तर माहिती दिली जात नाही. त्यामुळे पंढरपूर कॉरिडोरचा विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी २७३ कोटी ४७ लाख रुपयाचा अर्थसंकल्प मांडला. सर्वसाधारण सभेत यास नगरसेवकांनी मंजुरी दिली.

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेमध्ये मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सन २०२६-२७ चा नगरपरिषदेचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये २७३ कोटी ४७ लाख ५६ हजार रुपये जमा तर २७३ कोटी ४४ लाख रुपये खर्च तर ३ लाख ५६ हजार रुपये शिलकी अंदाजपत्रक सादर केले. यास सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
——————-

नगराध्यक्षांनी घेतलेला तघुलकी निर्णय अखेर मागे
पंढरपूर नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेस पंढरपुरातील पत्रकार उपस्थित राहिले होते. तेव्हा नगराध्यक्ष डॉ.प्रणिता भालके यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यामार्फत पत्रकारांनी सभागृहात थांबू नये, असा तघलुकी फतवा जारी केला. नगराध्यक्षांच्या या तघलुकी फतव्यामुळे उपस्थित पत्रकारांकडून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान ही माहिती उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे व नगरसेवक लक्ष्मण पापरकर यांना कळतात या दोघांनीही नगराध्यक्षांच्या भूमिकेचा विरोध केला. गेल्या २५ वर्षापासून पत्रकार सभागृहांमध्ये बसून वार्तांकन करत आहेत. मात्र ही नवीन पद्धत आम्ही सुरू करू देणार नाही, अशी भूमिका धोत्रे तसेच पापरकर यांनी घेतली.यावरून सत्ताधारी व विरोधी गटामध्ये खडाजंगी झाली. अखेर नगराध्यक्षांनी घेतलेला तघुलकी फतवा मागे घेत पत्रकारांना सभागृहात बसण्यास परवानगी द्यावी लागली.
————————-

कॉरिडोरसाठी दहा कोटीची तरतूद

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीमप्रोजक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडोर प्रकल्प मार्गी लावण्याची जबाबदारी निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आहे. नुकतीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पा संदर्भातील बैठक मुंबई येथे पार पडली. त्यामुळे हा प्रकल्प होणार हे निश्चित झालेले आहे. या कॉरिडोर प्रकल्पासाठी प्रशासकीय स्तरावर पंढरपूर नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये १० कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. याचा खुलासा करावा, अशी मागणी अपक्ष नगरसेवक ओंकार जोशी तसेच नगरसेवक शिंदेनाईक यांनी केली.
————————–
चौकट : ( झोपडपट्टी व अतिक्रमणावरून खडाजंगी )
पंढरपूर शहरामध्ये झोपडपट्टी वाढत आहे. तसेच अनेक रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पंढरपुरातील नागरिक तसेच भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमण व झोपडपट्टीवरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली.
————————-
चौकट : ( अर्थसंकल्पा मधील विविध कामांसाठीच्या तरतूदी )
या अर्थसंकल्पामध्ये स्मशानभूमीतील गॅस दाहिनी सुविधेमधून एक लाख रुपये जमा होणार आहेत.उद्यान फी मधून पाच लाख रुपये, जलतरण तलाव मधून पाच लाख रुपये, भंगार विक्री मधून ३० लाख रुपये जमा होणार आहेत. तर जलतरण तलाव दूरुस्तीसाठी १० लाख रुपये खर्च, गटारी,  कचराकुंडी दुरुस्ती १५ लाख रुपये खर्च, यमाई तलाव देखभाल १० लाख रुपये खर्च, अग्रिशामक दल १ लाख रुपये खर्च, भूसंपादन ७५ लाख रुपये खर्च, इमारत देखभाल दूरुस्ती ७५ लाख रुपये खर्च, अतिथीग्रह दुरुस्ती १० लाख रुपये खर्च, स्मशानभूमी सुधारणा २५ लाख रुपये खर्च, गटारी, नाले बांधणे ५० लाख रुपये खर्च अशा प्रकारे विविध कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

Post Views: 18
Previous Post

पुणे मुख्यालयावर शेती महामंडळाच्या कामगारांचा मोर्चा

Next Post

रोडरोमिओ, बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या मुलांवर कारवाई करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रोडरोमिओ, बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या मुलांवर कारवाई करा

ताज्या बातम्या

ड्रोनची व्याप्ती वाढणार कुलगुरू दामा.#public #marathinews #maharashtranews #breakingnews

February 28, 2026

आई बाबा झोपेतच गेले .. मुलींनी घाबरून आजोबांना फोन केला… #public #viral #marathinews #solapurnews

February 28, 2026

पावडर टाकून मुलांना पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात#public #solapurnews #marathinews

February 28, 2026

जिल्हाधिकारी जाणार आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून.#public #marathinews #maharashtranews

February 28, 2026

श्री शंकरलिंग प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

February 28, 2026

आदीला नदी परिसरातील प्रलंबित बांधकाम, वापर परवान्यावर नियमांनुसार कार्यवाही करावी 

February 28, 2026

वाळु तस्कर सुरज MPDA कायदयान्वये स्थानबध्द

February 28, 2026

जिल्ह्यातून पाच हजार शिक्षक मुबंई अधिवेशनात सहभाग होणार

February 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0709071

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697