सोलापूर: शहरातील विजापूर रोडवरील नूतन प्रशालेत शुक्रवारी मराठी दिन साजरा करण्यात आला सामाजिक सलोखा राखण्याची कार्य मराठी भाषा करते, भाषेमुळे मानव संस्कारक्षम बनतो, भाषाही मानवी जीवनातील दीपस्तंभ आहे, मराठी भाषा ही उन्नत आत्म्याचे सिंहासन आहे.
राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगत करण्याचे काम मराठी भाषा करते. सर्वांनी मराठी भाषेत साहित्य संकलन करून ज्ञानप्राप्ती करावी. असे प्रतिपादन श्री अनंत कुमार रणदिवे यांनी केले. विजापूर रोडवरील श्री नूतन प्रशालेमध्ये कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहाने साजरी करण्यात आली.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शहापुरे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालीमध्ये, काव्यवाचन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, अभिनय स्पर्धा, साहित्यिकांची माहिती, मराठी भाषेतील पारिभाषिक शब्द, वादविवाद स्पर्धा, घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, श्री बिडकर सर, बिराजदार एलके मॅडम, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल भोपे, प्रास्ताविक तेजश्री बोराडे, आभार रोशनी चव्हाण यांनी मानले.


















