जालना – येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांने एनएमएमएस परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
एनएमएमएस सन २०२५-२६ या वर्षीच्या परिक्षेसाठी इयत्ता ८वी या वर्गातील
एकूण २४ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी एकूण १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रीराम रामेश्वर गोडसे, प्रिया शंकर साठेवाड, मानसी अंकुश गायकवाड, सुखदा राजेश कुलकर्णी, शिवप्रसाद अमोल शिवणकर, श्रावणी कृष्णा जोशी, समिक्षा विनोद काळे, सायली ज्ञानेश्वर खरात, प्रथमेश उमेश हेकाडे, ऋषिकेश गजानन मोगल, रुपल संदीप जाधव, योगिराज अरुण वाकोडे, जान्हवी श्याम खुरपे, भक्ती संदीप कापरे या विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
याबद्दल विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. ९-जालना येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांने एनएमएमएस परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.

























