बार्शी – पुणे संचलित माहेर संस्था-माहेर बालगृह, निराधार महिला व पुरुष वृद्धाश्रम, समर्थनगर, तारवेवाडी, ता. हातखंबा, जि. रत्नागिरी येथे संस्थेच्या संचालिका शर्ली मॅडम यांच्या हस्ते साहित्यिक सौ सुमन शिवानंद चंद्रशेखर यांना राज्यस्तरीय माहेर साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी पत्रकार व लेखक श्री राजेंद्रप्रसाद मसूरकर, जिल्हा व महिला, बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सौ समृद्धी वीर, जि. प. सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर, सौ विद्याताई बोंबले, सरपंच तन्वी कोकजे, प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे, वृषभ खडसे, शीतल हिवराळे, कुटुंबीय अनेक साहित्यिक यांच्या उपस्थितीत माहेर साहित्यरत्न पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. हलगीच्या तालात, लेझीमच्या उत्साहात मिरवणुकीने व औक्षण करुन साहित्यिकांचे स्वागत करण्यात आले. साहित्यिक समाजसुधारणेचे व क्रांती करण्याचे काम करु शकतात, असे प्रतिपादन राजेंद्रप्रसाद मसूरकर यांनी केले.
यावेळी लहान मुले, मुली,मतिमंद वृद्ध स्त्री-पुरुषांनी हृदयस्पर्शी नृत्य सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी, दत्ता गोसावी, प्रकाश गव्हाणे, म. सा. प.चे निपाणीकर, देशमुख व सर्वच साहित्यिक, मैत्रिणी यांनी सौ. सुमन चंद्रशेखर यांचे अभिनंदन केले आहे.






















