अक्कलकोट – करजगी येथील एम एस ई बी कार्यालयातून सुरक्षा गार्ड या पदावरून श्रीकांत मोरे हे सेवानिवृत्त झाले. या सेवानिवृत्तीबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सौरभ शामराव मोरे यांच्या हस्ते माजी सैनिक श्रीकांत मोरे यांचा सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील सेवेकरी शहाजी यादव ,रोहन शिर्केआदिसह सेवेकरी वर्ग ,स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. १९९७ साली भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्या नंतर १९९७ ते २००९ पर्यंत सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावली.
यानंतर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल , लिंबीचिंचोळी येथील पॉवरग्रीड येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. यानंतर करजगी एमएसईबी येथे सुरक्षा रक्षक म्हणून सहा वर्ष काम करून माजी सैनिक श्रीकांत मोरे हे सेवानिवृत्त झाले.
दिनांक २७ फेब्रुवारी रोजी श्रीकांत मोरे यांच्या वाढदिवसा दिवशीच सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा अन्नछत्र मंडळात तसेच करजगी एमएसईबी कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. मंजूर टिनवाला एड. हल्ले यांच्यावतीने श्रीकांत मोरे यांचा सत्कार करण्यात आला.






















