पंढरपूर – उपविभागातर्फे महिला दिनानिमित्त पोलिसांकडून महिलां तसेच मुलींचा सन्मान करण्यात आला.
पंढरपूर उपविभागातर्फे महिला दिनानिमित्त सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व त्यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहरातील, पंढरपूर तालुक्यातील सर्व महिलांना, महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस अंमलदार त्यामध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन, पंढरपूर शहर पोलीस स्टेशन आणि पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून महिला दिनानिमित्त महिलांचा मान सन्मान वाढावा, समाजामध्ये महिला विषयी लोकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस अंमलदार यांच्या वतीने महिलांना गुलाब पुष्प व लहान मुलींना चॉकलेट देऊन त्याचा मानसन्मान करण्यात आला.
या उपक्रमातून पंढरपूर विभागातील पोलिसांनी महिला दिन साजरा केलेला आहे सदर महिला दिनासाठी पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे ,पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पंढरपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक घनवट त्याचप्रमाणे महिला पीएसआय रावण, महिला पीएसआय धडके पाटील, महिला पीएसआय बेणेवाड मॅडम पोलीस उपनिरीक्षक जगताप व इतर अंमलदार यांनी सहभाग नोंदवला.


















