अक्कलकोट – कलबुर्गी चे ( राज्य कर्नाटका ) ग्रामदैवत शरण बसवेश्वर महाराज यांची यात्रा महोत्सव मोठया उत्साहात लाखो भाविकाच्या उपस्थिती मध्ये रथोत्सवाने सांगता झाली
कलबुर्गी जिल्हयासह बिदर विजयपुर जिल्हया सह महाराष्ट्रातील लातुर सोलापुर उस्मानाबाद जिल्ह्यातील लाखो भाविक शरण बसवेश्वर यात्रेकरिता रंगपंचमी दिवशी रथोत्सवाकरिता एकत्र आली होती पहाटे पासून दर्शनाकरिता भाविकांनी गर्दी केली होती कलबुर्गी शहरात पहाटेपासुन घरोघरी सडासांमर्जन रांगोळी घालून भाविक दर्शनाकरिता मार्गस्थ झाले होते शरण बसवेश्वर महाराज की जय च्या घोषात हजारो भाविकांनी सुर्यास्त दरम्यान रथ ओढला .
रथा वर भाविकांनी खारीक केळी पुष्प मालाची उधळण केली यात्रे दरम्यान भाविकांनी श्रीफळ वाढविले पेढे वाटले . कलबुर्गी शहरात ठिक ठिकाणी भाविका साठी महाप्रसाद भोजन थंड पाणी मठ्ठा प्रसाद आदीची सोय केली होती यात्रे दरम्यान प्रासादिक वस्तुची मोठी उलाढाल झाली .
लहान मुलाकरिता झुले पाळणे खेळणी ची दुकाने थाटली होती बाल गोपाल वृद्ध युवक साऱ्यांनी शरण बसवेश्रर महाराज की जय चा घोष केल्याने सारा आसमंत दुमदुमून गेला शोभेच्या दारूच्या आताषबाजीने आसमंत दुमदुमला



















