मंगळवेढा – मंगळवेढा शहरातील धर्मगाव रोड वरील रामचंद्र नगर येथील महेश किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानात मध्यरात्री चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने रात्री २:३५ वाजण्याच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून चोरी केल्याची तक्रार दुकान मालकाने मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे.
*महेश मोहन मेटकरी (रा. धर्मगाव रोड, मो. ९८९०६२०५८०)* यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, त्यांच्या दुकानाचे एक लॉक तुटलेले आढळले असून चोरट्याने दुकानाबाहेरील इलेक्ट्रिक बल्ब काढून टाकला होता. आतमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील ५,००० रुपये रोख रक्कम आणि सुमारे ४,००० रुपये किमतीचा किराणा माल चोरून नेला.
चोरीला गेलेल्या मालामध्ये काजू, बदाम, केशर, परफ्यूम यासारख्या महागड्या वस्तूंचा समावेश आहे. एकूण ९,००० रुपयांचे नुकसान झाल्याचे अर्जात नमूद केले आहे.
सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिनांक १५/११/२०२६ रोजी सकाळी ११:५० वाजता नोंद करण्यात आली असून आधिक तपास पाे.हे.काँ.दतात्रय व्हरे करीत आहेत.
Views: 10