Monday, November 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

तरुण भारतbyतरुण भारत
November 16, 2026
in west maharashtra
0
आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर-  आंबे (ता. पंढरपूर) येथे विहीर खोदकाम सुरू असताना माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळून विहिरीत अडकलेल्या चार कामगारांच्या बचावासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेले अभियान तब्बल २५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाले. या दुर्घटनेत चारही कामगारांचा मृत्यू झाला असून, घटनास्थळीच वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर चारही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
आंबे येथे रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी विहीर खोदकाम सुरू असताना अचानक माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग तसेच संबंधित बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
रविवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. विहिरीतील माती व दगडाचा मोठा ढिगारा आणि निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती यामुळे बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. बचावकार्यादरम्यान आवश्यक खबरदारी घेत एनडीआरएफच्या पथकाने उपलब्ध साधनसामग्री आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे मोहीम सुरू ठेवली. अखेर चारही कामगारांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
—————–
चौकट – (एनडीआरएफ, प्रशासन आणि ग्रामस्थांचे बचावकार्यात समन्वय)
या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य केले. जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपदा मित्र, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही बचावकार्यासाठी आवश्यक सहकार्य केले. सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून ही मोहीम पूर्ण करण्यात आली.
बचाव मोहिमेचे संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः या ठिकाणी थांबून पार पाडले. तसेच कामगारांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले व धीर दिला. तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही रात्री एक वाजता आंबे येथे भेट देऊन बचाव मोहिमेची माहिती घेतली.
——————–
चौकट: (मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात)
बचावकार्या दरम्यान रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या कामगाराचा, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या कामगाराचा, तर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चौथ्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चारही मृतदेहांचे घटनास्थळीच वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
—————–
चौकट: ( दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विहीर बुजविणार)
या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विहिरीबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. एनडीआरएफच्या पथकाने दिलेल्या तांत्रिक सल्ल्यानुसार संबंधित विहीर बुजविण्यात येणार आहे. तसेच विहिरीच्या कडेला बॅरिकेडिंग करून परिसर सुरक्षित करण्यात येणार आहे. भविष्यात या ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे.
—————–
चौकट – (दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन)
या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीमार्फत संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
विहीर खोदकाम सुरू असताना माती व दगडाचा ढिगारा नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, दुर्घटनेमागील तांत्रिक कारणे कोणती होती, तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या किंवा नाहीत, या सर्व बाबींची चौकशी समितीमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. चौकशीत कोणाचीही जबाबदारी अथवा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.
Views: 13
Previous Post

मध्यरात्री किराणा दुकान फोडले; रोख रक्कमेसह ९ हजारांचा किराणा माल लंपास

Next Post

दुधनीच्या सय्यद इस्माईल यांना राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दुधनीच्या सय्यद इस्माईल यांना राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित

दुधनीच्या सय्यद इस्माईल यांना राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

दुधनीच्या सय्यद इस्माईल यांना राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित

दुधनीच्या सय्यद इस्माईल यांना राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित

November 16, 2026
आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

November 16, 2026

मध्यरात्री किराणा दुकान फोडले; रोख रक्कमेसह ९ हजारांचा किराणा माल लंपास

November 16, 2026
वीर धरणातुन निरा डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये समाधान रब्बी हंगामाच्या थोड्याफार आशा पल्लवित

वीर धरणातुन निरा डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये समाधान रब्बी हंगामाच्या थोड्याफार आशा पल्लवित

November 16, 2026

1 ते 10 नोव्हेंबर दरम्यानचे रू.3150/-प्रमाणे बील शेतक-यांच्या खात्यात जमा

November 16, 2026
बार्शीच्या विकासासाठी प्रयत्नशील -आ. राजेंद्र राऊत

बार्शीच्या विकासासाठी प्रयत्नशील -आ. राजेंद्र राऊत

November 16, 2026
कृषी साहीत्य खरेदीसाठी प्रस्ताव सादर करा_ उपसभापती मनीषा पाटील

कृषी साहीत्य खरेदीसाठी प्रस्ताव सादर करा_ उपसभापती मनीषा पाटील

November 16, 2026
क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी ग्रुपच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर 

क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी ग्रुपच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर 

November 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1521170

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!