अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांना ज्ञानदिप पुरस्कार जाहीर झाले आहे. यानिमीत्ताने येथील स्विमींग ग्रुपच्या वतीने स्विमींग ग्रुपचे संस्थापक तथा देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना स्विमींग ग्रुपचे सदस्य श्रीकांत झिपरे यांनी प्रज्ञापुरी कोल्हापूर येथील श्री.स्वामी समर्थ मंडळ व स्वामी भक्त प.पु.काटकर साहेब यांनी स्थापन केलेल्या श्री.स्वामी समर्थ मंदीर संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठीत व मानाचा असा ज्ञानदिप पुरस्कार यंदाच्या वर्षी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान (मुळस्थान) अक्कलकोट चे चेअरमन तथा नगरसेवक व ग्रुपचे संस्थापक सन्माननीय महेश मालक इंगळे यांना जाहीर झाले आहे.
ज्ञानदिप पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रुपये एक लाख असे आहे. सदरहू पुरस्काराचा वितरण सोहळा दि.१३ मार्च रोजी कोल्हापूरात संपन्न होणार आहे. ही बाब समस्त स्विमींग ग्रुपसाठी व महेश मालक इंगळे आणि प्रथमेश मालक इंगळे यांच्यासाठी अभिमानास्पद आहे. या अभिमानाचा सर्व स्विमींग ग्रुपचे ऋण व्यक्त करता यावा या मुळे आज येथे लाभणाऱ्या पुरस्काराप्रित्यर्थ सन्माननीय महेश मालक इंगळे यांचा सत्कार करुन हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्याचे मनोगत व्यक्त केले.
तर पुरस्काराच्या माध्यामातून प्राप्त होणारी एक लाख रुपयांची धन राशी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यासाठी वापर केली जाईल असे सांगून श्री स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील अशी मनोकामना व्यक्त केली.
यावेळी आज जागतिक महिला दिनानिमीत्त नगरसेवक महेश मालक इंगळे व स्विमींग ग्रुप यांच्या वतीने परिसरातील गरजू व कष्टकरी महिलांना साडया वाटप करुन महिलांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी स्विमींग ग्रुपचे सदस्य संतोष पराणे, श्रीकांत झिपरे. बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सागर गोंडाळ, सुनिल पवार, मनोज जगताप, विश्वनाथ देवरमनी, संतोष जवळगे, मिरजगीचे डेप्युटी सरपंच सिद्धलिंग निंबाळ, भुताळी मैंदर्गी, सुधाकर पाटील चंद्रकांत सोनटक्के, बाबा सुरवसे अमर पाटील रमेश कणबसे, कुमार हत्तुरे, रफिक पठाण, जयंत चिल्लाळ, अमोल कापसे, स्वामीनाथ मुसळे, दशरथ लोंढे, जाफर मिस्त्री, रमेश शिंदे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जगताप यांनी केले तर आभार श्रीकांत झिपरे यांनी मानले.
फोटो ओळ – ज्ञानदीप पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महेश इंगळे यांचा स्विमिंग ग्रुपच्या वतीने सत्कार करताना स्विमींग ग्रुपचे सदस्य तर दुसऱ्या छायाचित्रात
जागतिक महीला दिनानिमीत्त नगरसेवक महेश इंगळे यांच्या वतीने साडया वाटप करुन महिलांचा सन्मान करताना महेश इंगळ, व स्विमींग ग्रुपचे अन्य सदस्य दिसत आहेत.



















