अक्कलकोट – महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत तालुक्यातील इंडियन मॉडेल स्कूल, अक्कलकोट येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी वेदांत अभिषेक जोजन तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कडबंगाव येथील शयान नबीलाल मियावाले यादोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे त्यांच्या शाळेतील गणित शिक्षक व मुख्याध्यापकांनी कौतुक करून अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे अक्कलकोट तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची बाब मानली जात आहे.उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची पुढील स्तरावरील गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे.

















