पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्ह्य परिषद प्राथमिक केंद्र शाळा पिलीव या शाळेतील विविध स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला .
यामध्ये महीला दिनानिमित्त पहीली व दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या संगीत खुर्ची व लिंबु चमचा तसेच तिसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित मेहंदी व रांगोळी स्पर्धा यामधील विजयी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला .तसेच शाळेत बाल आनंद बाजार आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्वाधिक विक्री करणारे विद्यार्थी, राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट प्रकल्प सादर करणारे विद्यार्थी तसेच पाचवीमधील सैनिक स्कूल परीक्षेत यश संपादन करणारे विद्यार्थी तसेच मार्गदर्शन करणाऱ्या सुप्रिया पांगे मॅडम यांचाही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला .यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने विद्यार्थ्यांना ट्राॅफी व रोख बक्षीस तर श्रीराम गणेश मिञ मंडळाच्या वतीने 160 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले .
यावेळी शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष अमोल गांधी ,सदस्य नानासाहेब मदने, समशेरसिंग रजपूत, हनुमंत पिसे ,विजय देवकर, मुख्याध्यापक साळुंखे, तसेच आवताडे ,बगाडे ,वाघमारे ,देशमुख ,सुहास कोल्हे सर ,राजु चौरे ,गोरवे सर ,हत्तीकर सर ,शितल कोल्हे मॅडम, देशमुख मॅडम, महामुनी (पोतदार) मॅडम, करमाळकर मॅडम, खटावकर मॅडम, पाटील मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक, पालक ,विद्यार्थी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो _ पिलीव येथील जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा.
























