बार्शी – श्री शिवाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कविता सादरीकरण व लेखवाचन या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावर्षीच्या महिला दिनाची गिव्ह टू गेन (Give to Gain) देणे म्हणजेच मिळवणे ही संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडत महिला सशक्तीकरण, शिक्षण आणि समानतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, कला समन्वयक प्रा. डॉ. बी. डी. पारसे, आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ. समाधान पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. श्रीराम वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात महिलांचे समाजातील योगदान, शिक्षणातील प्रगती आणि महिलांना समान संधी मिळणे किती आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच महिलांना संधी, ज्ञान आणि पाठिंबा दिल्यास समाज अधिक प्रगत होतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.राहुल पालके यांनी केले. त्यांनी श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थींनीच्या विविध क्षेत्रातील योगदानाबाबत माहिती दिली. त्यांनी कवितेचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. महिला सशक्तीकरणाच्या विविध पैलूंविषयी माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील संधींची माहिती दिली. प्रा. वैभव कुलकर्णी यांनी संरक्षण क्षेत्रातील सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग या महिलांचे योगदान प्रस्तुत केले.
मीरा गायकवाड, वैशाली देशमुख, अश्विनी जाधव, पायल लोखंडे, तेजस कोळेकर, श्रीधर झांबरे , त्रिशा जाधव या विद्यार्थ्यांनीही कवितांचे सादरीकरण करुन स्त्री शक्तीचा जागर केला. महिला दिनाचे औचित्य साधून श्रुती तांबे, सृष्टी गवळी, सायली पौळ, रुपाली टिंगरे, नंदिनी भाकरे, प्रथमेश करळे यांनी लेखवाचनातून महिलांच्या विश्वाला साद घातली.
























